...तर राजकारणातून संन्यास घेईन -राज ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2017 09:48 PM IST

raj_thackery_pune18 फेब्रुवारी : नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या नावावर एक इंचही जमीनही नाही, जर असेल तर राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हानच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलंय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांची अखेरची सभा दादरमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि सेनेवर सडकून टीका केली. भाजपचा कारभार फार पारदर्शक आहे. त्यामुळेच पुण्यात लोकं सभेला आली पण दिसली नाही अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली.

शिवसेना आणि भाजप काय करतात तर फक्त भांडतात. याचा जनतेशी काहीही संबंध नाही. फक्त जनतेवर निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला जातय आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

काल मी मुख्यमंत्र्यांना थापाड्या बोललो ते मुख्यमंत्र्यांना चांगलंच झोंबलं. मुख्यमंत्री मला म्हणाले मी नकलाकार आहे. हो आहेच, अशी मुख्यमंत्र्यांसारखी व्यंगचित्र माझ्यापुढे असतील तर मी काय करणार असा टोलाच राज ठाकरेंनी लगावला. तसंच फडणवीस म्हणतात नाशिक दत्तक घेणार पण यांना मोदींनीच दत्तक घेतलंय ते  काय नाशिकला दत्तक घेणार अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. माझ्या नावावर नाशिकमध्ये एक इंच जमीन जर सापडली तर राजकारणातून सन्यास घेईल असंही राज ठाकरे म्हणाले.

सेनेच्या मंत्र्याना राजीनामा द्यायचे आहेत. तर वाट कसली पाहता.  खिशात कशाला ठेवता राजीनामा, हिंमत असेल तर देवून टाका. पण सत्तेसाठी हपापलेली सेना असं करणार नाही. मुंबईत बिल्डरांना जागा मिळते. पण बाळासाहेबांच्या समारकासाठी यांना जागा मिळत नाही?, शिवसेनेचा दादरच्या महापौर बंगल्यावर डोळा आहे. असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 09:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...