...मग युती करायला कशाला आला होतास ? -उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_thackery_pune18 फेब्रुवारी : आम्ही जर महापौर बंगला बळकावतोय मग युती करायला कशाला आला होतास असा थेट सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांना विचारलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसी मैदानावर आज शेवटची सभा पार पडली. अखेरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. मुंबईची तुलना पाटण्यासोबत करणारे मुख्यमंत्री फडणवीस राज्याच्या इतिहासातील सर्वात फोन मुख्यमंत्री ठरले आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. पण, उद्धव ठाकरे याला नकार दिला. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी यावर बोलण्यास टाळलं होतं. पण, आज अखेरच्या सभेत उद्धव यांनी राज ठाकरेंना खडेबोल सुनावले. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्यावर आमचा डोळा असेल तर मग युती करायला कशाला आला होतास असा थेट सवालच उद्धव ठाकरेंनी विचारला.

मुख्यमंत्र्यांनी मला निराश केलेलं आहे. दुय्यम खाती दिली तरी शांत राहिलो आणि काँग्रेसला दूर ठेऊन नवीन कारभार करू म्हणून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला पण यांनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. पंतप्रधनांपासून सोसायटीच्या अध्यक्षापर्यंत सर्वच तुम्हाला हवं मग आम्ही काय भांडी घासायची? असा खोचक सवालही उद्धवंनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 09:30 PM IST

ताज्या बातम्या