निकालानंतर राज ठाकरे फक्त नकलांचे कार्यक्रम करतील-मुख्यमंत्री

निकालानंतर राज ठाकरे फक्त नकलांचे कार्यक्रम करतील-मुख्यमंत्री

  • Share this:

cm_nashik44418 फेब्रुवारी : राज ठाकरे यांच्याकडे निवडणुकीनंतर फक्त नकला करण्याचे काम शिल्लक राहतली. आता गणेशोत्सवात त्यांचे कार्यक्रम ठेवावे लागतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज नाशिकमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव-राज आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. निवडणुकीनंतर राज ठाकरे फक्त नकलांचे कार्यक्रम करण्यासाठीच शिल्लक राहतील असं सांगत त्यांनी शेलक्या शब्दात त्यांचा समाचार घेतला.

तर ' उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

पुढील 5 वर्ष माझ दत्तक गाव योजनेनुसार आजपासून नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा करत माझ्या हातात एकहाती नाशिकची सत्ता द्या..नाशिक बदलवून दाखवतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

तसंच कुंभमेळ्याचं सर्व नियोजन आम्ही केलं. पैसा सरकारने दिला,महापालिकेकडे पैसा नव्हता. नाशिकला 2219 कोटी निधी दिला. या पैशातून नाशिकचा विकास झाला असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या