'मतदानाचा सेल्फी काढा,मालमत्ता करात सूट मिळवा'

'मतदानाचा सेल्फी काढा,मालमत्ता करात सूट मिळवा'

  • Share this:

930aprilvoting_pbangal18 फेब्रुवारी : मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात चित्रपटाच्या तिकीटावर 15 टक्के सूट जाहीर केलीये आता उल्हासनगरमध्ये मतदान करून सेल्फी काढा आणि मालमत्ता करात 25 टक्के सूट मिळवा अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली.

उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही ३५ ते ४० टक्के एवढीच असते. कायम मतदानात निष्क्रियता दाखवणाऱ्या उल्हासनगरच्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका नवीन फंडे वापरत आहेत. जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी. आता महापलिकने मतदानाच्या दिवशी सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मतदानाच्या दिवशी मतदाराने मतदान केल्यानतर शाई लावलेला आपला सेल्फी फोटो ८३२९२७१४८३ या व्हाॅट्स अॅप  क्रमांकावर पाठवायचा असं शहरातील प्रत्येक प्रभागातून ५ फोटो असं २० प्रभागतून १०० फोटो निवडले जातील. या निवडक मतदारांना २०१७-१८ या चालू  वर्षाच्या मालमत्ता करात २५ टक्के सूट देणार आहेत  अशी माहिती महापालिका आयुक्तानी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2017, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading