Elec-widget

चांदीचे नारळ ते शिलाई मशीन वाटप,10 जणांवर गुन्हा दाखल

चांदीचे नारळ ते शिलाई मशीन वाटप,10 जणांवर गुन्हा दाखल

  • Share this:

naral418 फेब्रुवारी : मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठे चांदीचे नारळ तर कुठे शिलाई मशीन वाटपाचा प्रकार घडल्याचं समोर आलंय.

त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील मतदारांना भेटवस्तूंचं वाटप केल्या प्रकरणी 2 उमेदवार आणि इतर 10 जणांवर आचारसंहिता भंग आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला गेलाय.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचाही समावेश आहे. आत्तापर्यंत झालेल्या कारवाईत तब्बल 45 लाख किमतीचं सोनं आणि 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम ही निवडणूक आयोगाच्या हाती लागलीये अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेतील मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी दिलीय.

शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी काटे यांनी मतदारांना लाच म्हणून शिलाई मशीनचं वाटप करतांना तर अपक्ष उमेदवार योगेश गवळी यांनी त्यांची निशाणी असलेले चांदीची झालर असलेले नारळ वाटप करत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...