S M L

निवडणुकीनंतरच्या पाठिंब्यावर राज ठाकरेंकडूनही सस्पेंस

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2017 07:26 PM IST

निवडणुकीनंतरच्या पाठिंब्यावर राज ठाकरेंकडूनही सस्पेंस

18 फेब्रुवारी : महापालिकेच्या निकालानंतर शिवसेनेला पाठिंबा द्यायची वेळ आली तर त्याचा निर्णय काय घ्यायचा हे मीच ठरवणार आहे असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सस्पेंस कायम ठेवलाय. तसंच टाळीचा प्रश्न आधी सेनेनं उपस्थितीत केला होता. मग कुणी आधी जगजाहीर केलं होतं असा सवाल करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत संवाद साधला. टोल नाक्याच्या ते शिवसेनाला टाळी देण्यापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली. निवडणुका आल्या तर सभा घ्याव्याच लागताय मला काय ट्रम्प यांना सुद्धा घ्यावा लागली होती. पण, आतापर्यंत अनेक चढउतार आले. यश अपयश येतच असतं. ग्रामीण भागापर्यंत पोहोचलो नाही असं नाही. चढउतार सगळ्यांच्या आयुष्यात येताच, ते कुणाला चुकले नाही अशी कबुलीही राज ठाकरेंनी दिली.

शरद पवार हे मोठे नेते आहे. पण माझा शब्द वापरू नका असं ते म्हणताय. मध्यावधी निवडणुका लागतील असं ते भाकित वर्तवताय. मुळात आता त्यांची ज्योतिष्याची भूमिका झाली असून ती त्यांची खासियत आहे असा टोला ठाकरेंनी लगावला.

बाळासाहेबांसारखा करिष्मा दुसऱ्या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी नेहमी आदर्श नेते आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

Loading...

उद्धव ठाकरे यांच्या फोन प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले, माझा उद्देश, इगो बाजूला ठेवून मी पुढे आलो होतो. परप्रांतीयांच्या गालावर मारण्यापेक्षा हात पुढे केला तर त्यात काय चूक केली. मला मातोश्रीवर जाण्यासाठी काही कमीपणा वाटत नाही.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे राजकारणासाठी अनफीट असल्याची टीका केली होती. त्याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. टाळीचा प्रस्ताव हा आधी 'सामना'मधून आला होता.मग त्यावेळी कुणी जाहीर केलं ?, त्यावेळी कशाला जगजाहीर करायचं. आम्ही बोललो तर अज्ञान आणि यांनी बोललेलं चालतं असा पलटवार राज ठाकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 03:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close