पृथ्वीवरचा आठवा खंड सापडला ?

पृथ्वीवरचा आठवा खंड सापडला ?

  • Share this:

zelandia18 फेब्रुवारी : पृथ्वीवरचा आठवा खंड सापडल्याचा दावा काही संशोधकांनी केलाय. झीलेंडिया असं या खंडाचं तात्पुरतं नाव ठेवण्यात आलंय.

या खंडाचा ९० टक्के भाग समुद्राखाली आहे, आणि जो भाग वर आहे तो न्यूझीलंड देशाचा काही भाग आहे, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

एखादा भूमास खंड म्हणून ओळखला जाण्यासाठी जे निकष असतात, ते सर्व निकश हा खंड पूर्ण करतोय, असा दावा जियॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या संशोधकांनी केलाय. गेल्या २० वर्षांपासून झीलेंडियाला खंडाचा दर्जा देण्याची मागणी होतेय.

 या ८ व्या खंडाबद्दल थोडक्यात...

- ऑस्ट्रेलिया खंडाच्या शेजारी

- न्यूझीलंड देश झीलेंडिया खंडात असल्याचा दावा

- एकूण भूभाग : ४९ लाख चौरस किमी

- ९४ टक्के भाग समुद्राखाली

- एकूण लोकसंख्या : ५० लाख

- ६-८ कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया खंडापासून वेगळा झाला

- अँटार्क्टिकापासून ८.५-१३ कोटी वर्षांपूर्वी वेगळा झाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2017, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading