मल्याळम अभिनेत्रीचं अपहरण, धावत्या कारमध्ये विनयभंग

 मल्याळम अभिनेत्रीचं अपहरण, धावत्या कारमध्ये विनयभंग

  • Share this:

bhavan418 फेब्रुवारी : मल्याळम अभिनेत्री भावना हिचे कोची शहरात अज्ञात टोळीने अपहरण करून धावत्या कारमध्ये तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

चित्रपटाचं शूटिंग आटोपून घरी परतत असताना अज्ञात टोळीने एर्नाकुलम भागात अथनीजवळ शुक्रवारी रात्री भावनाची कार अडवली आणि बळजबरीने तीला गाडीत बसवलं. त्यानंतर धावत्या गाडीत त्यांनी तिचा विनयभंग केला. विनयभंग करुन आरोपींनी कार थांबवली आणि दुसर्‍या कारने पळून गेले.

या टोळीत पूर्वीचा कार चालक होता, असा दावा भावनाने केला आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर भावनाचा कारचालक मार्टिन याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकारणी अज्ञातांविरुद्ध अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास चालू आहे.

काय घडलं नेमकं ?

न्यूज18च्या बातमीनुसार, आरोपींनी भावनाची कार जबरदस्ती अडवून तीचं अपहरण केलं आणि धावत्या कारमध्ये तिची छेडछाड केली. यानंतर तिला तसंच कारमध्ये सोडून ते निघून गेले. त्यांपैकी एकजण दुसऱ्या कारमधून गेला. जवळपास तासभर ती त्यांच्यासोबत होती. ते तिला कारमधून फिरवत होते. हे अंतर जवळपास 25 कि.मी.चं होतं. नंतर रात्री 10.30 च्या सुमारास तिला घराच्याजवळ सोडलं. या प्रकार सुरू असताना त्या आरोपींनी तिचे फोटो काढले आणि व्हिडिओही काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2017, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading