Elec-widget

पूर्ण महाराष्ट्र माहिती नसणाऱ्यांनी माझा शब्द वापरू नये -पवारांचं टीकास्त्र

  • Share this:

sharad_pawar_twiit18 फेब्रुवारी : केंद्र सरकारची 'मी आणि माझा' ही भूमिका वाढलीये. याआधी अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांनी 'मी आणि माझं' बोललेलं आठवत नाही. ज्यांना पूर्ण महाराष्ट्र माहिती नाही त्यांनी 'माझा' हा शब्द वापरू नये अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. गेल्या वेळी निवडणुका पुन्हा येऊ नयेत म्हणून तेव्हा पाठिंब्याची भूमिका घेतली होती. पण यावेळी आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही असं पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

भाजपकडून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला जातोय. पारदर्शिक कारभाराबाबत बोलताना भाजपची एवढी आर्थिक ताकद कशी वाढली याच उत्तर भाजपला द्यावं लागेल. भाजपने आर्थिक गुंतवणुकीची माहिती द्यावी अशी मागणीही पवारांनी केली.

वृत्तपत्रावर बंदी घालण्याची मागणी हे हुकुमशाहीचं लक्षण आहे. कुठल्याही वृत्तपत्रावर बंदीची मागणी अयोग्य आहे असं सांगत पवारांनी सामनावर बंदीचा विरोध केलाय.

सेना भाजप ज्या पद्धतीने एकमेकांचं वास्तव दर्शन करुन देताहेत त्यामुळे ते मुंबई पालिकेचा कारभार कसा चालवणार याचं उदाहरण देत आहेत. त्यामुळे हे मुंबई महापालिकेचा कारभार काय चालवणार? असा प्रश्न निर्माण झालाय अशी टीकाही पवारांनी केली. तसंच  भाजप आणि सेनेतल्या संघर्षातला फायदा राष्ट्रवादीला मिळेलच असं नाही असंही पवार म्हणाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com