विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचं निधन

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2017 12:28 PM IST

 विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचं निधन

jabuvantrao_dhote18 फेब्रुवारी : विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते, माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे निधन झाले. पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.

धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या लासीना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जांबुवंतराव धोटे यांचा अल्परीचय

 विधानसभेतील भाषणांमुळे त्यांना विदर्भाचा सिंह अशी उपाधी

- जांबुवंतराव धोटे १९७१ मध्ये नागपूर मतदारसंघातून लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले.

Loading...

- १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश

- १९८० साली ते लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून

- २००२ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत विदर्भ जनता काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष थाटला.

-  यवतमाळमधून ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले

- विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...