अब की बार 'गाजर' सरकार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

अब की बार 'गाजर' सरकार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

  • Share this:

uddhav_thane17 फेब्रुवारी : भाजप म्हणजे थापा सरकार आहे. नुसत्या थापा मारण्यात हे पटाईत आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत गाजर सरकार आहे. अब की बार बार गाजर सरकार अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच शिवरायांचा भगवा नकोसा झाला आणि पप्पू कलानी आपलासा झाला असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

ठाण्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. मी आज प्रचारासाठी नाही तर ठाणेकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. ठाण्यात शिवसेनाच येणार हा आत्मविश्वास आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला.

कल्याण-डोंबिवलीकरांना दोन थापा मारल्यात आणि निवडणुकांनंतर काहीच दिलं नाही. ज्या गावकऱ्यांना थापा मारल्यात त्याच गावकऱ्यांना मुख्यमंत्री भेटच देत नाही. हिंमत असेल तर ती 27 गावं तुम्ही दिलेल्या शब्दानुसार वेगळे करा. मुख्यमंत्री म्हणतायेत हा माझा शब्द आहे. त्यांचा शब्द कल्याण-डोंबिवली महापालिकेत दिलेला कुठे गेला ?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थिती केला.

तसंच मुख्यमंत्री नुक्कड सभा घेतात आणि आम्हाला धमक्या देतात. आपल्या पक्षात गुंडांची भरती करून ठेवलीये. शिवरायांचा भगवा नकोसा झाला आणि पप्पू कलानी आपलासा झाला असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

भाजपवाले थापाडे आहे. मतदान यंत्रावर बटण दाबल्यानंतर धनुष्यबाणावरच दाबले गेले की नाही याची खात्री करा, कारण भाजपवाले काहीही करू शकतात असा आरोपही ठाकरे यांनी केला.

भिवंडीत म्हात्रे यांची हत्या कोणी केली ?, तो भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याने ज्या प्रकारे हत्या केली. ते पाहून मुख्यमंत्री तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहात का नाही ? असा सवालही उद्धवंनी उपस्थिती केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 10:17 PM IST

ताज्या बातम्या