News18 Lokmat

मुख्यमंत्री हे भाजपकुमार थापाडे, राज ठाकरेंचा घणाघात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2017 10:19 PM IST

 मुख्यमंत्री हे भाजपकुमार थापाडे, राज ठाकरेंचा घणाघात

raj_thackery_on_cm17 फेब्रुवारी : नुसत्या घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपकुमार थापाडे आहे अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसंच नाशिकमध्ये मी करुन दाखवलं तुम्ही 25 वर्षात काय केलंय हे इथं येऊन दाखवा असं आव्हानच त्यांनी सेनेला दिलं.

नाशिकमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली.   नाशिकमध्ये 4 ते 5 सभा घ्यायच्या होत्या. पण आजची ही एक सभा पुरेशी आहे. आजची सभा ही विजयाची सभा आहे असं म्हणत त्यांनी सभेला सुरुवात केली.

भाजप नेते केंद्रापासून ते राज्यापर्यंत नुसत्या थापा मारताय. खोट बोला पण रेटून बोला हे भाजपकडून शिकण्यासारखं आहे. असं सांगत त्यांनी "मी हे करेन, मी ते करेन" अशी मुख्यमंत्र्यांनी नक्कल काढत त्यांनी भाजपकुमार थापडे अशी उपाधीच देऊन टाकली.

भाजपवाले तोंडात येईल ते बोलताय.निवडणुकीत त्यांनी पैशींची पोती उघडली आणि आपले वास घेत तिकडे गेले. जे गेले ते आपल्यासाठी संपले असं म्हणत त्यांनी पक्षातून गेलेल्यांना फडकारून काढलं.

राज्य़ सरकार शहर विकास नियमावली आणणार आहे.  या नियमावलींमधील कडक नियमांची अंमलबजावणी झाली तर अर्धे नाशिक विस्थापित होईल. नाशिककरांना स्वत:च्या हक्काच्या जमिनीवर बांधकाम करता येणार नाही असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेस जे करतेय तेच भाजप करतेय. यांच्यात आणि त्यांच्यात कोणताही फरक नाही. यांना उमेदवार भेटत नाही म्हणून अर्धे गुंड आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे कार्यकर्ते भरले आहे. एवढंच काय तर पुण्यात एक बिल्डर ठरवतोय कुणाला उमेदवारी द्यायची अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि कुणाला भ्रष्टाचार करू दिला. भ्रष्टाचार करू दिला नाही म्हणून काही जण पळून गेले. पण  शिवसेनेनं 25 वर्षांत काय काम केलं हे दाखवावं. याच ठिकाणी येऊन मी एका कोपऱ्यात उभा राहतो तुम्ही दुसऱ्या कोपऱ्यात या आणि सांगा काय काम केलं असं जाहीर आव्हानही राज ठाकरेंनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...