17 फेब्रुवारी : शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं राजकारणात अनेक घडामोडी होतात. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसला शिवसेनेचा पुळका आला आहे. उद्धव ठाकरे हे 'सज्जन गृहस्थ' असल्याचं सर्टिफिकेटच काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी दिलंय. अमित शहांसारखे काळे उद्योग उद्धव ठाकरेंनी केले नसल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.
उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी असं भाजपच्या नेत्यांनी आव्हान दिलं होतं. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. उद्धव ठाकरे हे सभ्य व्यक्ती असून त्यांची भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही असं सिंग यांनी म्हटलं आहे. ज्या प्रकारचे काळे धंडे शहा यांनी केलेत तसे उद्योग उद्धव ठाकरे यांनी केले नसल्याचंही सिंग यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीनंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाल्यामुळेच मुंबईच्या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांची छबी झळकत असल्याची बोचरी टीकाही सिंग यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत काँग्रेसनं मेट्रो आणल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कौतुकाची एकप्रकारे काँग्रेसनं परतफेड केलीये. काही काळापासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पूरक भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरी काँग्रेस आणि शिवसेनेत वैचारिक मतभेद असून दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सिंग सांगायला विसरले नाहीयंत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा