S M L

शिर्डीतील साई संस्थानामध्ये आयएएस अधिकारी नेमा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Samruddha Bhambure | Updated On: Feb 17, 2017 07:18 PM IST

शिर्डीतील साई संस्थानामध्ये आयएएस अधिकारी नेमा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

17 फेब्रुवारी :  रोज हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या शिर्डी संस्थानच्या प्रशासकीय प्रमुखपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

राज्यात देशविदेशातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन केंद्र पैकी एक अशी शिर्डीची ओळख आहे.  या संस्थानावर आयएएस अधिकारी नेमावा अशी मागणी करत भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र गोंदकर आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप कुलकर्णी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणावर आज (शुक्रवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात  शिर्डी साई संस्थानाचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असं आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता राज्य सरकार संस्थानावर आयएएस अधिकारी कधी नेमणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 07:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close