S M L

हा 'तारे जमीं पर' मधला 'ईशान' आहे !

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2017 04:01 PM IST

हा 'तारे जमीं पर' मधला 'ईशान' आहे !

17 फेब्रुवारी : आमिर खानच्या 'तारे जमीं पर' मधला ईशान अवस्थी आठवतोय ? होय, तोच तो लहान मुलगा ज्याने पहिल्याच सिनेमात आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमाने पालकांना लहान मुलांच्या भावविश्वाविषयी विचार करायला तर भाग पाडलंच शिवाय मुलांच्या मनातली घुसमट किती भयंकर असते याकडेही लक्ष वेधलं.

या सिनेमात डिस्ल्केक्शियाग्रस्त ईशानची भूमिका साकारणारा दर्शिल सफारी एका नव्या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण आता तो छोटासा, निरागस आणि बिचारा ईशान राहिलेला नाही...तो आता मोठा झालाय. दर्शिलचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रदीप अटलरी दिग्दर्शित 'क्विकी' या सिनेमातून दर्शिल बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. ही एक टीनएज लव्हस्टोरी असून तरूण मनाच्या सत्य भावनांवर आधारीत असेल. सिनेमाची निर्मिती टोनी डिसूजा, अमूल विकास मोहन आणि नितीन उपाध्याय यांनी केली आहे. पत्रकार तरन आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. सोबत दर्शिलचा नव्या लूकमधला फोटोही त्यांनी ट्विट केलाय.'तारे जमीं पर' नंतर दर्शिलने 'बम बम बोले' या सिनेमातही काम केलं. लहान वयात प्रेक्षकांच्या मनाला भावलेला दर्शिल आता मोठेपणीही प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 03:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close