17 फेब्रुवारी : अहमदनगरमधील दारूकांड ताज असतानाच नाशिकमध्ये चक्क अॅम्ब्युलन्समधून दारू साठा वाहतूक करण्याचा प्रकार उघड झालाय. जवळपास 30 बॉक्समध्ये बनावट दारू असल्याचं उघड झालंय. आतापर्यंत तीन ठिकाणाहून मद्यसाठा जप्त करण्यात आलाय.
निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतलीये. तीन ठिकाणी छापे मारण्यात आले आहे. तर विल्होळी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून देखील मध्यसाठा जप्त करण्यात आलाय. एका अॅम्ब्युलन्स मधून मध्यसाठा जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या अॅम्बुलन्सवर नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजनांचा फोटो आणि आमदार बाळासाहेब सानप यांचा फोटो आहे. स्मिता पाटील फाऊंडेशनच्या वतीने ही अॅम्ब्युलन्स चालवण्यात येतेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा