सोमय्यांवर शिवसेनेचा पैसे वाटपाचा आरोप

सोमय्यांवर शिवसेनेचा पैसे वाटपाचा आरोप

  • Share this:

SOMAYYA

17 फेब्रुवारी : किरीट सोम्मयांचे चिरंजीव नील सोमय्यांच्या गाडीत पैसे आणि साड्या सापडल्या आहेत, असा आरोप शिवसेनेनं केलाय.नील सोमय्या यंदा निवडणुकीला उभे आहेत.

काल मुलुंड भागात त्यांच्या इनोव्हा गाडीत वाटप करण्यासाठी पैसे आणि साड्या सापडल्या, असा आरोप सेनेचे नेते करतायेत.शिवसेना नेते राहुल शेवाळे म्हणाले, ' स्वत: किरीट सोमय्यांना पैसे आणि साड्या वापरताना रंगेहाथ लोकांनी पकडलं. त्यानंतर ते पळून गेले.'

सेनेच्या अनेक नेत्यांनी काल रात्री मुलुंडकडे धाव घेतली. पण गाडीत काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

यावर किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे हे आरोप हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, ' मुंबई शिवसेनेच्या हातून चाललीय म्हणून ते आता माझ्या कुटुंबावर आरोप करतायत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 17, 2017, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading