पाकिस्तानात दर्ग्यामध्ये आयसिसने केलेल्या हल्ल्यात 100 मृत्युमुखी

 पाकिस्तानात दर्ग्यामध्ये आयसिसने केलेल्या हल्ल्यात 100 मृत्युमुखी

  • Share this:

pakistan4 17 फेब्रुवारी : पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात आयसिसने घडवून आणलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये सुमारे 100 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. कराचीपासून 200 किमी अंतरावर असलेल्या सहवान शहरात एका सूफी दर्ग्यामध्ये हा हल्ला झाला. सूफी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यामध्ये एक आत्मघातकी दहशतवादी घुसला आणि त्याने हा स्फोट घडवून आणला.

सगळ्यात आधी या दहशतवाद्याने बॉम्ब फेकला आणि नंतर स्वत:ला पेटवून घेतलं. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आणि जखमींमध्ये  महिला आणि मुलांचा समावेश आहे. या दर्ग्यामध्ये शेकडो भाविक जमले होते. पाकिस्तानमधल्या इधि फाऊंडेशनचे कार्यकर्ते मदतीला धावून आले आणि त्यांनी स्फोटातल्या जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवलं.

या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतलीय. आम्ही सिंध प्रांतातल्या शियापंथियांना लक्ष्य केलंय, असं आयसिसने म्हटलंय. हल्ला झालेला हा सूफी दर्गा दुर्गम भागात असल्यामुळे हैदराबाद, जामशोरो, मोरो, दादु आणि नवाबशाह या ठिकाणांहून वैद्यकीय पथकं पाठवावी लागली. बचावकार्यात पाकिस्तानी लष्कराचीही मदत घेण्यात येतेय.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. पाकिस्तानातल्या अंतर्गत सुरक्षेचा आढाव घेण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीची बैठकही बोलवलीय. आयसिस आणि तालिबानने पाकिस्तानमधल्या सूफी दर्ग्यांना नेहमीच लक्ष्य केलंय. त्यामुळे या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधल्या सुफी दर्ग्यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 12:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading