'या' गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं मतदान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2017 11:56 PM IST

'या' गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं मतदान

latur416 फेब्रुवारी : लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील धनगरवाडी या गावाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावात मतदान केलंय.

८०० लोकसंख्या असलेल्या या गावाला स्वातंत्र्यापासून मतदान केंद्रच मिळाले नाही. त्यामुळे धनगरवाडीतील ३१० मतदार हे ०४ किमी लांब असलेल्या सानोळा गावात जाऊन मतदान करत होते.

मात्र, यावेळेस पहिल्यांदाच धनगरवाडी गावातील मतदारांनी आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

इतकी वर्षे बाहेर गावी जाऊन लोकशाहीतील आपला हक्क बजावणाऱ्या ग्रामस्थांना आपल्याच गावात मतदान केल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 11:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...