शिवरायांची शपथ घेऊन सांगा भ्रष्टाचार केला नाही, गडकरींचं सेनेला आव्हान

शिवरायांची शपथ घेऊन सांगा भ्रष्टाचार केला नाही, गडकरींचं सेनेला आव्हान

  • Share this:

gadakari44416 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला नाही हे शपथ घेऊन सांगा असं थेट आव्हानच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शिवसेनेला दिलंय.

मुंबईतल्या प्रचारसभेत नितीन गडकरींनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून आपण सत्तेत आहात. एकदा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जनतेला सांगा की आम्ही भ्रष्टाचार केला नाही. पण, सेनेचे नेते शपथ घेण्याची हिंमत दाखवणार नाही अशी टीका गडकरींनी केली. तसंच शिवसेना टक्केवारीचा कारभार करीत असल्याचा टोलाही नितीन गडकरींनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 16, 2017, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading