सामनावर बंदी आणून दाखवाच, मग आम्ही दाखवतो -उद्धव ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2017 10:10 PM IST

सामनावर बंदी आणून दाखवाच, मग आम्ही दाखवतो -उद्धव ठाकरे

uddhav_thackery_nsk17 फेब्रुवारी: तीन दिवस सामनावर बंदी आणा अशी मागणी करताय. काय आणीबाणी लावताय का ?, उगाच विस्तावाशी खेळू नका,  सामनावर बंदी घालूनच दाखवा मग आम्ही काय ते दाखवून देऊ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

नाशिकमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला. शेतकऱ्याला आशेने बँकेत खातं उघडायला लावलं. पण आले का 15 लाख खात्यात ?  शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही. मग बँकेत खातं उघडण्याची जबरदस्ती का ?, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, देवेंद्रजी कर्ज माफ करा आणि पुढील कर्जावरचं व्याज माफ करा, माझा तुम्हाला पाठिंबा राहिन असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी सेनेला दिलं.

सामनातून लिहितो ते काही रिकामा म्हणून लिहित नाही. तीन दिवस सामनावर बंदी आणा अशी मागणी करताय. काय आणीबाणी लावताय का ? अन्यायावरती वार करतो तो सामना आहे. आम्ही बंदी झुगारून टाकू,बंदी आम्ही मानणार नाही. जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रात काय होईल याचा विचार करा असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

आपल्याच देशाला धमकी देणारा पंतप्रधान हा पहिल्यांदाच पाहिलाय. नोटबंदीमुळे देशात भयाचं वातावरण झालंय. मग परिवर्तन कसचं करणार असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आता भाजपच्या स्टेजवर गुंड बसतात. सगळ्या गुंडांची यादी गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून मागवली आहे. आणि त्या गुंडांना आत टाकलं नाही तर पक्षात घेतलंय अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...