देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत

  • Share this:

sanjay_raut_on_bjp

16 फेब्रुवारी : देवेंद्र फडणवीस हे लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. ते अमरावतीत आज (गुरूवारी) बोलत होते.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या काळात ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून काल निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या मागणीचा संजय राऊत यांनी आजच्या सभेत चांगलाच समाचार घेतला आहे. 'सामना'वर बंदी म्हणजे आगीशी खेळ असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सातत्याने सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले जात आहेत. त्यात आता संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्रासाठी आम्ही गुंड आहोत ,याचा आम्हाला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांनी तर गुंडांना क्लीन चिट देण्याचा  डुप्लिकेट कारखाना उघडला आहे, असंही ते म्हणाले. तर सरकारचा अंत जवळ आला आहे , 23 फेब्रुवारीनंतर राज्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल, असं भाकीतही संजय राऊत यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 09:03 PM IST

ताज्या बातम्या