Elec-widget

शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 'नाकाबंदी'

शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 'नाकाबंदी'

  • Share this:

shivneri_saba316 फेब्रुवारी : किल्ले शिवनेरीवरील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी बनवल्या जाणाऱ्या हेलिपॅडवरुन वाद निर्माण झालाय. या हेलिपॅडला शिवप्रेमी संघटनांनी विरोध केलाय.

19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर शिवजंयतीचा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आलंय.

याला शिवऋण प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी कामगार संघटनेने विरोध केलाय. हेलिपॅडमुळे किल्ल्यातल्या वास्तुला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा शिवप्रेमी संघटनांनी केलाय.

परवानगी नसतानाही मागील अनेक वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री दरवर्षी शिवजन्मस्थानजवळ हेलिकॉप्टर लँडिंग करतात. या ठिकाणी अनेक शिवकालीन वास्तू आहेत त्याना धोका पोहचू शकतो. त्यामुळे अशी परवानगी मिळू नये यासाठी शिवऋण प्रतिष्ठानने पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयाला पत्रव्यहार केला आहे.

पुरातत्व विभागाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली आहे. पुरातत्व विभागाच्या १९५८ च्या कायद्या नुसार हे लँडिंग बेकायदेशीर असल्याचं उघड झाला आहे. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्र्याचे  हेलिकॉप्टर  लँडिंग होणार का ? असं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने याबाबत  परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...