प्रवीण मुधोळकर,नागपूर 16 फेब्रुवारी : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक, लँन्ड डेव्हलपर्स,बिल्डर्स प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झालेत. 4 वार्डांच्या प्रभागात निवडणूक लढवणे मिनी विधानसभेच्या निवडणुकीसारखं असल्यामुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्ती वापरली जातेय पाहुयात विशेष वृतांत...नागपुरची वाढती लोकसंख्या, शहराचा चारही बाजुंनी झालेल्या विस्तार यामुळे गेल्या 10 वर्षांत शहरातील बहुतांश भागातील जागेच्या किमती झपाट्याने वाढल्या. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्यांची लॉबी तयार झाली. आणि आता हे सगळे राजकारणात सक्रिय झालेत.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक बांधकाम व्यावसायिक भाजपमध्ये सामिल झाले. त्यातल्या काहींना उमेदवारीही मिळाली. पण पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी डावलल्याचा आरोप केलाय.भाजपकडून बिल्डरांना उमेदवारीविक्की कुकरेजा, सुरेंद्र यादव, शेषराव गोतमारे, मनोज पांडे, रमेश चोपडे, भूषण शिंगणे, सुनील हिरणवार, बापू चिखले, दीपक वाडीभस्मे, बंटी कुकडे, विजय राऊत, बाल्या बोरकर, मेघराज मेघनानी, देवेंद्र मेहर, अजय बुग्गेवार, प्रमोद तभाणे, प्रकाश भोयर तसंच साधना बरडे यांचे पती नरेश बरडे आणि लक्ष्मी यादव यांचे पती मुन्ना यादव या बांधकाम व्यावसायिकांना उमेदवारी...शिवसेनेकडून बिल्डरांना उमेदवारीअनिस धावडे, राय बिल्डर्सचे किशोर राय यांना शिवसेनेकडून उमेदवारी..काँग्रेसकडून बिल्डरांना उमेदवारीविकास ठाकरे, प्रफुल्ल गुढडे-पाटील, विद्या पन्नासे यांचे पती राकेश पन्नासे यांना उमेदवारीपण हे उमेदवार निवडून आले तर ते आमच्या समस्या सोडवतील का असा नागरिकांच्या मनात संभ्रम आहे.एकाबाजुला बिल्डरधार्जिणं सरकार अशी भाजपविरोधात ओरड असतांना शिवसेना आणि काँग्रेसनंही काही बांधकाम व्यवसायिकांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे आगामी काळातले महापालिका राबवणार असलेले 2 मोठे प्रकल्प निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी कुणाला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv