जि.प.चा पहिला टप्पा संपला, 4 हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2017 11:41 PM IST

जि.प.चा पहिला टप्पा संपला, 4 हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद

16 फेब्रुवारी : राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी मतदान झालं. पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी 69 टक्के मतदान झालं.

गडचिरोलीतल्या आठ तालुक्यात दुपारी तीन वाजताच मतदान संपलं. पहिल्या टप्प्यातल्या 855 जागांसाठी उभ्या असलेल्या 4 हजार 289 उमेदवारांचं भवितव्य मचतपेटीत बंद झालंय.

15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी  4 हजार 289 उमेदवार रिंगणात आहेत. आज काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचा सूर उमटले. वर्धा जिल्ह्यातल्या मसाळ आणि नालवाडी या मतदारसंघात मतदारांची नावं इकडीची तिकडे झाल्याचं पाहायला मिळालं.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले मतदान:

अहमदनगर- 70.83

औरंगाबाद- 66.22

बीड- 68.73

बुलडाणा- 67.31

चंद्रपूर- 71.75

गडचिरोली- 71.45

हिंगोली- 72.49

जळगांव- 64.14

जालना- 74.80

लातूर- 70.31

नांदेड- 71.69

उस्मानाबाद- 71.94

 परभणी- 74.94

वर्धा- 64.93

आणि यवतमाळ- 70

एकूण सरासरी- 69

कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागलीये ?

यवतमाळ

मदन येरावार, पालकमंत्री

संजय राठोड, सहपालकमंत्री

माणिकराव ठाकरे, उपसभापती, विधान परिषद

मनोहर नाईक, आमदार राष्ट्रवादी

चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्य मंत्री

विजय वडेट्टीवार, आमदार, काँग्रेस

गोंदिया

प्रफुल पटेल, खासदार राष्ट्रवादी

नाना पटोले, खासदार, भाजप

मराठवाडा

परळी - पंकजा मुंडे विरुध्द धनंजय मुंडे

भोकरदन - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

कन्नड - पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर

लातूर

अमित देशमुख, आमदार काँग्रेस

वर्धा

पंकज भोयर, आमदार भाजप

समीर कुणावार, आमदार भाजप

सुरेश देशमुख, माजी आमदार, राष्ट्रावादी

रणजीत कांबळे, माजी मंत्री राष्ट्रवादी

अहमदनगर

बाळासाहेब थोरात, काँग्रेस

राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस

मधुकर पीचड, राष्ट्रवादी

राम शिंदे, पालकमंत्री, भाजप

नांदेड

अशोक चव्हाण - प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

भास्करराव पाटील खतगावकर, उपाध्यक्ष भाजप

जळगाव

गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

एकनाथ खडसे, माजी मंत्री

गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री, शिवसेना

गुलाबराव देवकर, माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी

सतिश पाटील, माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close