S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीत मतं डिपॉझिट केलं तर मुद्दल सुद्धा मिळणार नाही -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2017 07:13 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत मतं डिपॉझिट केलं तर मुद्दल सुद्धा मिळणार नाही -मुख्यमंत्री

16 फेब्रुवारी : मतांचे डिपॉझिट करताना काँग्रेस राष्ट्रवादीत करू नका, त्यांच्याकडे व्याज तर सोडा मुद्दल सुद्धा मिळणार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच भाजपच्या बँकेत मतांचं डिपॉझिट केल्यास दामदुप्पट मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. साताऱ्यातील प्रचार सभेत ते बोलत होते.

कराड येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढणार असून मताचे डिपॉझिट करताना जपून करा. बंद पडलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे करू नका. त्यांच्याकडे व्याज तर सोडाच मुद्दल देखिल मिळणार नाही. मात्र भाजपच्या बँकेत मताच डिपॉझिट ठेवलं तर पाच वर्षात दामदुप्पट मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश चिटणीस अतुल भोसले उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी संस्था मोडीत काढल्या. बँका सहकारी साखर कारखाने बंद पडल्या असून त्यात भ्र्रष्टाचार केला आहे. सहकाराचं स्वाहाकार केलेल्या या नेत्यांना वेळीच ओळखा भाजप आता सहकाराचा स्वाहाकार होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 06:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close