S M L

भाजपचा 'कार्टून'वार, शिवसेनेला 'खाऊ सेना'ची उपाधी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 16, 2017 05:25 PM IST

भाजपचा 'कार्टून'वार, शिवसेनेला 'खाऊ सेना'ची उपाधी

16 फेब्रुवारी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धुमधडाका मुंबईत सुरू आहे. हे दोन्ही नेते परस्परांवर जोरदार टीका करत आहेत. तोच सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. प्रचारसभांमध्ये एकमेकांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात दोन्ही पक्षांनी आघाडी घेतली आहे. पण आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी एक कार्टून सिरिजच सुरू केली आहे.

GIF3


हॉलिवूडमधल्या प्रसिद्ध स्टुडिओ मेट्रो गोल्डविन मेयरच्या (एमजीएम) लोगोची काॅपी करून त्यात सिंहाऐवजी शिवसेनेचा वाघ दाखवण्यात आला आहे. उपहासात्मक पद्धतीने शिवसेनाचं 'खाऊ सेना' अर्थात भ्रष्ट सेना असं या सिरिजचं नाव असून त्यात सेनेच्या मुंबई महापालिकेतील कारभारावर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्या नावाचा उल्लेख न करता या कार्टूनमध्ये एक वाघ आणि त्याचा बछडा दाखवण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्या आहेत. सेनेकडूनही भाजपला जशास तसे उत्तर दिलं जाईल यात काही शंका नाही.

GIF2

मुंबई पालिकेत शिवसेनेने केलेला, भ्रष्टाचार, गैरव्यावहारावर या व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून मिश्कीलपणे भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये वाघाला लाच घेताना, रस्त्यावर खड्डे करताना, पेंग्विनसाठीचे बालहट्ट पूरवताना, भ्रष्ट अभियंत्यांना पाठीशी घालताना तसंच दुकानदारांकडून हप्ते वसुली करताना दाखवलं आहे. सध्या या क्लिप्स व्हॉटसअप, यू-ट्यूब, फेसबुकवर व्हायरल केल्या जात आहेत.

Loading...

GIF4

एकीकडे, शिवसेनेचा 'सामना'तून अप्रत्यक्षरित्या आपला प्रचार असतो, असा आरोप करत भाजपने तीन दिवस 'सामना' बंद ठेवण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलीये. तर दुसरीकडे स्वत: भाजप शिवसेनेला खिजवताना दिसत आहे. एकंदरीत या व्हिडिओमुळे भाजप-सेनेतील वाद आणखी चिघळेल यात काही शंका नाही, पण मतदारांचं यासगळ्यात चांगलंच मनोरंजन होताना दिसत आहे. आता शिवसेना भाजपच्या या कुरघोडीला कसं उत्तर देते याकडे सगळ्याच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 05:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close