शिवसेनेचा दावा नंदलाल यांनी फेटाळला, फडणवीसांना क्लीनचिट

शिवसेनेचा दावा नंदलाल यांनी फेटाळला, फडणवीसांना क्लीनचिट

 • Share this:

deven clean chit

16 फेब्रुवारी : शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर केलेला आरोपातली हवा निवृत्त माजी सनदी अधिकारी आणि चौकशी आयोगाचे अध्यक्ष नंदलाल यांनी बाहेर काढली असून, मुख्यमंत्र्यांना क्लीनचिट दिली आहे. नागपूरमध्ये स्थायी समितीकडून झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. IBN लोकमतशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून नंदलाल समितीने नागपूर महानगरपालिकेत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या पाहणीत स्थायी समितीतील काही सदस्यांनी हा घोटाळा केल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र त्यात महापौरपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या उलट फडणवीस यांनी घोटाळ्याची चौकशी करताना आपल्याला पूर्ण सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभाराची मागणी करणारे मुख्यमंत्री नागपूरचे महापौर असताना नागपूर पालिकेत घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता.स्थायी समिती सदस्यांच्या कंत्राटदारांसोबत परस्पर वाटाघाटी झाल्या आणि निविदांविना ठराविक कंत्राटदारांना कामं दिली असं शिवसेनेनं म्हटलं होतं.क्रीडा साहित्य आणि औषध खरेदीत हा घोटाळा झाला होता. देवेंद्र फडणवीस नागपूर माहापालिकेत महापौर असताना मोठा भ्रष्टाचार कसा झाला असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेनं नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची कागदपत्रंच मीडिया समोर आणून ‘पारदर्शक’ मुद्यावंर प्रश्नं उपस्थित केले.

मात्र, या घोटाळ्याच्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष नंदलाल यांची या सर्व आरोपात काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

 • फडणवीस महापौर असताना नागपूर पालिकेत घोटाळा
 • स्थायी समिती सदस्यांच्या कंत्राटदारांसोबत परस्पर वाटाघाटी
 • निविदांविना ठराविक कंत्राटदारांना कामं
 • क्रीडा साहित्य आणि औषध खरेदीत घोटाळा
 • नंदलाल समितीच्या चौकशी अहवालात ठपका
 • घोटाळ्याप्रकरणी काही नगरसेवकांना अटक

नंदलाल यांचं 'आयबीएन लोकमत'कडे स्पष्टीकरण

 • तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या आदेशाने चौकशी
 • स्थायी समितीच्या सदस्यांची कंत्राटदारांसोबत गुप्त बैठक
 • तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीसांचा घोटाळ्यात सहभाग नाही
 • अहवालात फडणवीस त्यांच्यावर कोणताही ठपका नाही
 • महापौर म्हणून फडणवीस यांचं तपासात पूर्ण सहकार्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 01:39 PM IST

ताज्या बातम्या