16 फेब्रुवारी : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत साधारण 20 ते 25 टक्के मतदान झालं आहे.15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान उत्साहात सुरू आहे मात्र काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचा सूर आहे. वर्धा जिल्ह्यातल्या मसाळ आणि नालवाडी या मतदारसंघात मतदारांची नावं इकडची तिकडे झाल्याचं पाहायला मिळालं.
या टप्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होतंय.पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त गडचिरोलीतल्या ८ तालुक्यातील ३५ जिल्हा परिषद जागा आणि ७० पंचायत समित्यांसाठी मतदान होतंय. या मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
21 फेब्रुवारीला दुसरा टप्पा पार पडणार आहे. दोन्ही टप्प्यांच्या मतदानाचा निकाल 23 फेब्रुवारीला लागणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा