15 फेब्रुवारी : मुंबईत करुन दाखवलेलं एक काम दाखवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय. तसंच मुंबई महापालिका घोटाळ्याचं आगार झालंय अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
मुंबईतल्या चिंचपोकळीतल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला. यांच्याकडे मुंबईतील काम बद्दल बोलण्यासारखं काहीही नाही.नुसतं करुन दाखवलं, करून दाखवलं म्हणूनच चालत नाही. जे काम केलं आहे ते दाखवा असं आव्हानच मुख्यमंत्र्यांनी केलं.
मुंबईत विकासावर काहीही बोलायला नसल्यानं मोदींवर शिवसेना टीका करीत असल्याचंही फडणवीस म्हणाले. गेल्या पंधरा वर्षांत मुंबई महापालिका घोटाळ्यांचं आगार बनल्याचंही फडणवीस म्हणाले. महापालिकेतून मुंबईकरांना सेनेनं लुटलंय अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv