15 फेब्रुवारी : सामनाविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंनी पुण्याच्या सभेत चांगलंच तोंडसुख घेतलं. सोळा वीस आणि एकवीस तारखेला सामनावर बंदी घालायची मागणी करणाऱ्यांनो प्रचार करणाऱ्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडाला काय बूच मारायचं का? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पुण्यात पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेनेची युती तोडण्याची इच्छा नव्हती. ती केवळ युती नव्हती दोन खासदार होते तुमचे तेव्हा केलेली युती आहे. अटलजींच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रीपद नको म्हणाले होते अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.
सामना छापायला बंदी करा म्हणता मग कोणत्या तोंडाने इंदिरा गांधी वर टीका करता ,ही आणीबाणी नाही का ?, का तुमच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडाला पण बूच मारायचं का असा सवालच उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केला.
२५ वर्ष आम्ही विरोधात कुठे बोललो. मुख्यमंत्री आणि मोदींना वाईट वाटतंय मी बोलतोय त्याच. मग त्यांनीच ठरवा कसं वागायचं. मला काय टीका करायला बरं वाटत का?, पण जो माझ्या राज्याची,मुंबईची अवहेलना करत असेल तर माझी बांधीलकी जनतेशी आहे. जनतेसाठी त्यांच्यावर आसूड ओढल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आभारही मानले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा