15 फेब्रुवारी : राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 जागांसाठी उद्या (गुरूवारी) म्हणजेच 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या सर्वच ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017ला मतमोजणी होणार आहे.
उद्या सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना आपलं मत नोंदवण्याची संधी आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
पहिल्या टप्प्यासाठी १५ जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त गडचिरोलीतल्या 8 तालुक्यातील ३५ जि. प. जागा आणि ७० पंचायत समित्यांसाठीही उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगानं सर्व तयारी केली आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आता मतदारांनीही आपला हक्क बजावला पाहिजं. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे.
झेडपीची दंगल (पहिला टप्पा) - 15 जिल्हा परिषद
306
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा