मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे महापौर असताना मोठा भ्रष्टाचार -अनिल परब

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 10:04 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे महापौर असताना मोठा भ्रष्टाचार -अनिल परब

anil_parab15 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभाराची मागणी करणारे मुख्यमंत्री नागपूरचे महापौर असताना मोठा भ्रष्टाचार कसा झाला असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय.

मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेनं नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची कागदपत्रंच माध्यमांसमोर आणली.  देवेंद्र फडणवीस नागपूर माहापालिकेत महापौर असताना झालेल्या भ्रष्टाचारावर नंदलाल समीतीने जो अहवाल सादर केला होता. तोच अहवाल आज शिवसेना आमदार अनिल परब यांनी मीडिया समोर आणून 'पारदर्शक' मुद्यावंर प्रश्नं उपस्थित केले आहेत. 2001मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नंदलाल समितीच्या अहवालात फडणवीस महापौर असताना मोठ्या प्रमाणात पालिकेत गैरव्यवहार झाल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी या बाबतचं उत्तर द्यावं असं आवाहनही शिवसेनेनं केलंय.

नागपूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर नंदलाल समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नागपूर महापिलिकेत महापौर असताना, कश्या प्रकारे भ्रष्टाचार केला आहे. त्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे.

२७ फेब्रुवारी २००१ चा हा अहवाल आहे. राजीव घोल्लार, कल्पना पांडे, वसुंधरा मसुरकर आणि देवेंद्र फडणवीस या 4 महापौरांच्या कालावधीत हा भ्रष्टाचार झाला असा आरोप परब यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...