हिंमतीने खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो-राज ठाकरे

हिंमतीने खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो-राज ठाकरे

  • Share this:

raj_thackery_diva15 फेब्रुवारी : हा माझा शब्द आहे म्हणे. स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो. कुणी बसवलेल्यांनी असं बोलू नये अशा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. तसंच सत्तेतून बाहेर पडायचं होतं तर आताच बाहेर पडून दाखवा असं आव्हानही राज ठाकरे यांनी सेनेला केलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिव्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपसह सर्वपक्षियांवर सडकून टीका केली. ठाण्यात सर्वाधिक परप्रांतीयांचे लोढे वाढले आहे. मुख्यमंत्री फडणवीस परप्रांतियांसाठी हिंदीतून भाषण करतात. परप्रांतीयांच्या मतावर भाजपचा डोळा आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

'अनधिकृत इमारती यांच्याच'

तसंच ठाण्यातील अनधिकृत इमारतीचा मुद्दा उपस्थितीत करत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे नेते सर्व एकत्र बसता. राष्ट्रवादी,भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या सर्वाधिक अनधिकृत इमारती आहे अशा आरोपही राज ठाकरेंनी केला.

'खुर्चीवर हिंमतीने बसणाऱ्यांनी शब्द द्यावा'

रस्त्यावरुन जाताना भाजपचे अनेक होर्डिंग पाहिले. त्यात हा माझा शब्द आहे असं मुख्यमंत्री सांगताय. पण स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यायचा असतो, बसवल्यांनी असं बोलू नये. उद्या जर मोदींनी तुम्हाला खुर्चीवरुन खाली उतरवलं तर तुमच्या शब्दाची काय सुरनळी करून पुंगी वाजवायची का ? असा  टोला राज ठाकरे यांनी लगावला.

'उमेदवारांना पैसे वाटले'

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडे पैसा येतोच कुठून ?, यांनी नोटाबंदीकरून पक्षासाठी पैसे दडवून ठेवले. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी दिले होते. आताही उमेदवारांना लाखो रुपये वाटले असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

'मोदींनी उद्धव ठाकरेंना ढुंकूनही पाहिलं नाही'

बाळासाहेब ठाकरे हे जे बोलायचे ते करून दाखवायचे. पण, तुम्ही त्यांच्या नावावर मतं मागू नका. त्यांच्या नावाखाली तुमचा गलथान कारभार दडवू नका अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. तसंच शिवस्मारकाच्या वेळी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे एकाच बोटीवरुन गेले होते. त्यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. त्याचवेळी शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे होतं असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. आताही ही लोकं सत्तेतून बाहेर पडणार नाही. जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते महापालिका निवडणुकीनंतर होणार आहे. हे दोघे पुन्हा एकत्र येतील असं भाकितच राज ठाकरेंनी वर्तवलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2017, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading