राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्यांची तोफ थंडावली

 राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्यांची तोफ थंडावली

  • Share this:

ashdash

15 फेब्रुवारी :  नारायण राणेंनी सलग 15 वर्ष सिंधुदुर्ग झेडपीची सत्ता भोगली पण जिल्ह्यातला एकही प्रकल्प पूर्ण केला नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एवढी एकच टीका वगळता राणेंच्या बालेकिल्ल्यात कुडाळमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या एकाही नेत्याने राणेंविरोधात एक चकार शब्द काढलेला नाही.

सिंधुदुर्गात राणेंची 50 वर्षं सत्ता होती तरीही शेतकऱ्यांचा विकास काही झाला नाही, या उलट इथले नेतेच मोठे झाले असं टोलाही मुख्यमंत्र्यांनी राणेंचा लगावला. तसंच, या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या विकासाचा पाढा वाचला. पण आश्चर्याची बाब म्हणजे, मुख्यमंत्र्यांची किंवा भाजपच्या अन्य कोण्याही नेत्याची तोफ शिवसेनेला किंवा आघाडी सरकारवर फार काही खास धडाडली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 09:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...