अघोरीपणाचा कळस ; काळीज,लिंग कापून अस्वलाला जाळलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 07:47 PM IST

अघोरीपणाचा कळस ; काळीज,लिंग कापून अस्वलाला जाळलं

gondiya4415 फेब्रुवारी : गोंदियामध्ये अंधश्रद्धेतून एका अस्वलाला जाळून टाकण्याची धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या गोरेगाव वनक्षेत्रामध्ये अस्वलाला विजेचा शॉक देऊन  त्याची शिकार करण्यात आली. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अस्वलाला जाळून टाकण्याचाही प्रयत्न झाला. पण शिकारीचा हा प्रयत्न आता उघडकीला आलाय. या अस्वलाची शिकार अंधश्रद्धेमुळे झाल्याचं समोर आलंय.

गोंदियामध्ये गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या तिल्ली मोहगावात अंधश्रद्धेतून एका अस्वलाचा बळी घेतल्याचं समोर आलंय. मोहगावात अस्वलाला शॉक देऊन त्याला मारण्यात आलं त्यानंतर त्याचं काळीज आणि लिंग कापण्यात आलं. तर त्या अस्वलाला जाळून पुरावा नष्ट केला गेला. अंधश्रद्धेतून मुक्या जीवांचा बळी दिल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडालीये.

अपत्यप्राप्तीसाठी अस्वलाची हत्या करण्याच्या घटना या भागात घडल्यायत. अस्वलाच्या नखांचा ताबीज घातल्याने जादूटोण्याचा असर होत नाही, अशीही एक अंधश्रद्धा इथं आहे. या गैरसमजांतूनच अस्वलाची शिकार केली जाते.

जादू टोण्याविरोधात कायदा कडक केला असला तरी असं प्रकार घडत असल्यानं मात्र प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...