मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल

मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल

  • Share this:

manoj_mhatre315 फेब्रुवारी : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ओसवालवाडी जवळच्या समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची काल राहत्या घराखाली दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून तसंच कोयत्यानं सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. हा हल्ला एवढा तीव्र होता की म्हात्रेंचा पंजा जागेवरच तुटून पडला.

या हत्येप्रकरणी चुलत भाऊ प्रशांत म्हात्रेसह, महेश म्हात्रे, मिथुन म्हात्रे, बंट्या उर्फ रणजित म्हात्रे , चिरंजीव ( मोटू) बळीराम म्हात्रे, गणेश पाटील, मयुरी उर्फ कोळी प्रकाश म्हात्रे अशा आरोपींची नावं आहेत. मात्र ही हत्या नेमकी राजकीय वैमनस्यातून झाली की आणखी काही दुसरं कारण आहे का ?, याचा तपास भिवंडी पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2017, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading