15 फेब्रुवारी : 'टाईमपास' फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकरला जळगावमध्ये चाहत्यांचा मनस्ताप सहन करावा लागलाय, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जळगावमध्ये 11 फेब्रुवारीला बहिणाबाई महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री आणि गायीका केतकी माटेगावकरला आमंत्रीत करण्यात आलं होतं. आता केतकी उपस्थित राहणार म्हणून अनेक चाहत्यांनी गर्दी या कार्यक्रमाला केली होती.
सगळा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरुन उतरताना चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. यावेळी केतकी भोवती एकही गार्ड किंवा बाऊंसरही न्हवता, असंही त्यांनी तक्रारीक म्हटलं आहे. तसंच खूप लोकं असल्यानं सेल्फी काढण्यासाठी तरूणाईनं एकच गर्दी केली होती. त्यामुळे तिला तिथून बाहेर पडता येईना. अखेर उपस्थित काही महिलांनी हाताचं कडं करुन केतकीला बाहेर काढून गाडीपर्यंत पोहोचवलं, असं पराग माटेगांवकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
पराग माटेगांवकर यांनी या प्रकारासाठी आयोजकांना दोषी धरलं आहे. घडलेल्या प्रकाराचा तिला आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाल्याचं त्याचं सांगितलं. तसंच पुन्हा कोणत्याही महिला कलाकारासोबत अशी घटना घडू नये म्हणून हे पत्र लिहित असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण अनेकदा पाहिलं आहे की, चाहत्यांमुळे कलाकारांना असंख्य त्रास सहन करावा लागतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केलेली होती मात्र केतकी अर्ध्या कार्यक्रमातून उठून गेल्यान हा गोंधळ उडाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा