नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' -रामदास कदम

 नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' -रामदास कदम

  • Share this:

Ramdas kadam1212

15 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून देशाची वाट लावली, काळा पैसा आणणार होते पण काळा पैसा काही परत आला नाही.  'खोदा पहाड निकला चुहा' अशी अवस्था झाली आहे अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.

कोकणात जिल्हा निवडणूक प्रचारादरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची तोफ पुन्हा धडाडली. रत्नागिरी जिह्यातील देव्हारे, पालगड, उन्हवरे दाभोळ येथील प्रचार सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षावर टीका केली.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंडांना पक्षात घेतलंय. सेनेची सत्ता आल्यास मी गृहमंत्री होईन आणि या गुंडांची चौकशी करून त्यांची रवानगी जेलमध्ये करेन असा दावाच कदम यांनी केला.

अजित पवार, सुनील तटकरे सिंचन  घोटाळ्यावर सरकार गप्प आहे. मात्र सेनेचे सरकार आल्यास अजित पवार, तटकरे  यांना जेलमध्ये  धाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2017, 4:56 PM IST

ताज्या बातम्या