पांगरमल प्रकरणात मृतांचा आकडा 6 वर; रुग्णालयातूनच दारू पुरवल्याचं उघड

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 09:47 PM IST

nagar_news3

15 फेब्रुवारी :  अहमदनगर जिल्ह्यात बनावट दारुनं हैदोस घातलं आहे. पांगरमलच्या दारुकांडात आतापर्यंत 22 जणांना बाधा झाली असून त्यात 60 जणांचा बळी गेलाय. 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील 10 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहेत. तर जिल्ह्यात अजून दोघांचा बळी गेला असून चारजण गंभीर असल्याची नागरिकांची माहीती आहे.

कहर म्हणजे, ही बनावट दारू जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या कँटीनमधून पुरवण्यात आल्याची धक्कादायतक माहिती समोर आली आहे. बनावट दारूचा हा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील बनावट दारुचं मोठं रॅकेट उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

दारूकांड प्रकरणी  अटकेत असलेला शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख भिमराव अव्हाडनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कँटीनवर छापा टाकला. तिथं बनावट दारूचा साठा आढळून आला. हे कँटीन कंत्राटी तत्वावर चालवायला देण्यात आलं होतं. सातजणांचा बळी घेणारी दारू इथूनच खरेदी करण्यात आली होती, अशी माहितीही मिळाली आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय कार्यालयातील माहितीच्या अधिकाराचे अर्ज ही आढळून आलेत दरम्यान या प्रकरणी कॅन्टीनचा मालक आणि कुकला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

नगर जिल्ह्यात बनावट दारू तयार करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयाच्या कँटीनमधून दारूसाठी जप्त होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे हे कँटीन शहर वाहतूक शाखेच्या मागील बाजूस आहे. अनेक पोलीस तिथं कायम चहासाठी येतात, असं सांगितलं जातं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...