शिल्पा शेट्टीच्या कंपनीला लागलं टाळं

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 03:38 PM IST

शिल्पा शेट्टीच्या कंपनीला लागलं टाळं

SHILPA

15 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांची कंपनी होम शॉपिंग चॅनल (Best Deal TV) बंद होण्याच्या मार्गावर आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक पडझड सुरू झाल्याने कंपनीचे संचालन तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले.

राज कुंद्रा यांनी डिसेंबरमध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 'नोटबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पण यामुळे उद्योगाचं खूप मोठं नुकसान झालं' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पैशांच्या कमतरतेमुळे कॅश ऑन डिलिव्हरी व्यवहारांचं खूप नुकसान झालं. इतकंच नाही तर पगार न झाल्याने कंपनीचे कर्मचारीही नाराज असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...