राज्यावर निवडणुका का लादता? - राज ठाकरे

राज्यावर निवडणुका का लादता? - राज ठाकरे

  • Share this:

raj thakre

15 फेब्रुवारी : राज ठाकरेंनी (मंगळवारी) विलेपार्ले इथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली.तुमचा अपमान होतोय म्हणून तुम्ही राज्यावर निवडणुका लादणार.तुमच्यासाठी करदात्यांना भुर्दंड का, असं नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस मतदारांना शब्द देतात, त्यांची खुर्ची तरी शाबूत आहे का,त्यांनी मोदींना विचारायला हवं की ते मुख्यमंत्री राहणार आहेत की नाही,अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांना त्यांना शाळेतल्या माॅनिटरची उपमा दिली. माणूस नुसता भला असून चालत नाही असंही ते म्हणाले.

नोटाबंदीमुळे काय फायदा झाला, किती पैसा जमा झाला, हे मोदींनी सांगावंच, असं आव्हानही त्यांनी दिलं.

नाशिकच्या रस्त्यावर खड्डे नाहीत,नाशिकमध्ये करून दाखवलं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2017, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading