काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंची गोळ्या झाडून हत्या

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 11:06 AM IST

काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंची गोळ्या झाडून हत्या

khun

15 फेब्रुवारी : भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची काल गोळ्या घालून आणि तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. ६ ते ७ हल्लेखोर मारुती अर्टिगा गाडीतून आले होते.

काल रात्री ८ वाजता म्हात्रे आपल्या इमारतीखाली गाडी पार्क करून घरी जात होते.तेव्हा पार्किंगच्या ठिकाणी हल्लेखोर आले आणि म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वारही केले. म्हात्रे रक्ताच्या थारोळ्यात पडले.त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं.पण त्यांचा जीव वाचवता आता नाही. हल्ला इतका भीषण आणि निर्घृण होता की म्हात्रेंचा पंजा घटनास्थळीच तुटून पडला होता. या हत्येमुळे भिवंडीत तणाव आहे.

निवडणुकीतल्या वादामुळे ही हत्या झाल्याचं बोललं जातंय, पण पोलिसांनी याची पुष्टी केलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर २०१३मध्येही त्यांच्यावर हल्ला झाला होता..पण नेम चुकल्यामुळे ते वाचले होते.

दरम्यान, म्हात्रे सलग १५ वर्षं नगरसेवक होते.त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे आणि सतत जनतेचे प्रश्व लावून धरण्यासाठी ते प्रसिद्ध होते.भिवंडीत त्यांचा स्वतंत्र चाहता वर्ग होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...