देवेंद्र फडणवीस म्हणजे घाशीराम कोतवाल फेम नाना फडणवीस : शरद पवार

  • Share this:

sharadpawar-kc8F--621x414@LiveMint14 फेब्रुवारी : देवेंद्र फडणवीस म्हणजे पुणेकरांना परीचित घाशीराम कोतवाल फेम नाना फडणवीस असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये.

पुण्यात शरद पवारांची सभा पार पडली. यासभेत शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजप-सेना राज्यात मांडीला मांडी लावून बसलेत. पण सेनेचे उद्धव म्हणतात, भाजप गुंडांचा पक्ष तर भाजपचे फडणवीस म्हणतात शिवसेना हा खंडणीखोर पक्ष नेमकं काय चाललंय याचा नेम नाही असा टोला शरद पवारांनी लगावला.

तसंच भाजपमध्ये गुंडांचं स्वागत स्वतः गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री करत आहेत. भाजपमध्ये जी सेना गेलीय त्यांचं क्वालिफिकेशन 302 ,खून आणि या कर्तबगार मंडळींचं स्वागत साक्षात"देवेंद्र"करत आहेत आणि त्यात फडणवीस म्हणजे पुणेकरांना परिचित घाशीराम कोतवाल फेम नाना फडणवीस आहे उपाधीच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना देऊ केली.

दाभोळकर,पानसरेंचे खुनी का सापडत नाहीत, पुरोगामी लोकांना जगणं मुश्किल झालंय. गेली अनेक महिने या प्रकरणांचा छडा लागत नाही. अरे कुठं नेवून ठेवला महाराष्ट्र माझा ? असा सवालच पवारांनी आपल्या शैलीत उपस्थिती केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 10:49 PM IST

ताज्या बातम्या