बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार लपवू नका -राज ठाकरे

  • Share this:

raj_thackery_banner314 फेब्रुवारी : मुंबईभर पोस्टर लावण्यात आलीये. पण, बाळासाहेबांच्या नावाखाली तुमचा भ्रष्टाचार लपवू नका अशी जहरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. तसंच भाजपला उमेदवार भेटत नव्हते म्हणून पैसे देऊन दुसऱ्या पक्षाचे उमेदवार फोडले असा आरोपही राज ठाकरेंनी केला. मोकळ्या जागेत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी क्लब उभारले असा आरोपही त्यांनी केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेर आज निवडणुकीच्या मैदानात उतरले. विक्रोळी इथं झालेल्या सभेत राज ठाकरेंची तोफ चौफेर धडाडली.  मुलगा अमित आजारी होता म्हणून प्रचारात उशिरा उतरावं लागलं असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातील दिलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शिवसेना आणि भाजपकडे वळवला. गेल्या काही दिवसांपासून दोन कोंबडी झुंझत होती. निवडणुका झाल्या की पुन्हा जवळ येणार आहे. भाजप-सेनेच्या भांडणाचा पालिका निवडणुकीशी काय संबंध आहे.  भाजप-सेनेला लोकांच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. शहरं बकाल होतायत पण कुणाचंच लक्ष नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली.

नवा भारत कुठे आहे ?

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी  नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधानांची भाषण झाली त्यात त्यांनी नवा भारत निर्माण होईल असं सांगितलं, त्यामुळे मी रोज नवा भारत कुठे झाला का पाहतोय पण दिसत नाही अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली.

'भाजपने उमेदवारांना प्रत्येकी 1 कोटी वाटले'

भाजपचा एक नेता माझ्याकडे आला होता. त्याने सांगितल्यानुसार, विधानसभेला भाजपनं प्रत्येक उमेदावाराला १ कोटी दिले होते. विधानसभेत एकूण 228 उमेदवार होते म्हणजे 228 कोटी रुपये भाजपने वाटले. आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहे किती पैसे वाटले असेल असा सवाल उपस्थिती करत पार्टी विथ डिफेन्स म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आणि तुमच्याकडे आहे अशी टीकाही राज यांनी केली.

'स्मारकासाठी पैसे तरी आहे का?'

अरबी समुद्रात स्मारक उभं करण्याची घोषणा करताय पण मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवेल. यांच्या खिशाला भोकं पडलीये, शिवस्मारक उभं करायला पैसे तरी आहेत का ?, कल्याण डोंबिवलीला साडे सहा हजार कोटी देण्याची घोषणा केली पण अजून साडेसहा रुपये तरी मिळाले का ? अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

'बाळासाहेबांच्या नावाने भ्रष्टाचार लपवू नका'

शहरभर शिवसेनेनं आम्ही हे करून दाखवलं ते करून दाखवलं असे पोस्टर लावलीये. पण बाळासाहेब जे बोलायचे ते करून दाखवायचे. बाळासाहेबांच्या नावाखाली तुमचा भ्रष्टाचार लपवू नका.  25 वर्ष सेनेनं काय केलं ?, गेल्या 25 वर्षांतील 77 हजार कोटी रुपये शिवसेनेनं कुठे खर्च केले याची माहिती द्यावी असं आव्हानच राज ठाकरेंनी केलं.  तसंच मराठी शाळा बंद करतायत आणि उर्दू शाळा काढत आहेत अशा आरोपही राज यांनी केला.

मोकळ्या जागेवर भाजप-सेनेचे क्लब

भाजपला उमेदवार मिळत नाही. उमेदवार फोडायला पैसे वाटप करताय. ज्या घरात मुलगा दिसला की हे बोट धरून फिरवण्यास तयार असता अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली. त्याचबरोबर मोकळ्या जागांवर भाजप-सेना नेत्यांचे क्लब उभे आहे. क्लबच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करण्याचा धंदा सुरू आहे अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

महापौर बंगल्यावर भाजपचा डोळा

बाळासाहेबांचं महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याचा हा डाव आहे. महापौर बंगल्यावर भाजपचा डोळा आहे. उद्या महापौर बंगला हडपला तर महापौर कुठे जाणार ?,राणीच्या बागेत, तिथे बरेच पिंजरे खाली आहे असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या