भाजपने खातं उघडलं, 'कमळ'धारी गुंड जिल्हा परिषदेवर बिनविरोध

भाजपने खातं उघडलं, 'कमळ'धारी गुंड जिल्हा परिषदेवर बिनविरोध

  • Share this:

anukshrao_pandharpur14 फेब्रुवारी : भाजपचं कमळ गुंडांच्या हातात आहे असं म्हणण्याची वेळ आलीये. कारण पंढरपूरच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून कुख्यात गुंड गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी बिनविरोध निवडून आलाय. या अंकुशरावची दहशत शोलेतल्या गब्बरसारखी आहे. त्याच्या दहशतीमुळे कोणीही अंकुशराव विरोधात साधा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या निमित्तानं विठ्ठलरुक्मिणीच्या पंढरपुरातून एक गुंड सोलापूरच्या जिल्हा परिषदेत गेलाय.

पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी या कुख्यात गुंडाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती.  कधीकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या सरजीवर आज मारामाऱ्या आणि दोन खुनाचे आरोप आहेत. तर अन्य काही आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता झालीय. पंढरपूरमधील गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारीही देण्यात आली.

मात्र, आश्चर्य म्हणजे त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या तिन्ही उमेदवारांचं अर्ज निवडणूक आयोगाच्या छाननीत बाद झालेत. या दोन्ही उमेदवारांच्या सूचकांनी आपली अर्जावरची सही ही फसवून केल्याचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला केलं. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. मात्र सरजींच्या दहशतीपुढे कुणाचीही त्यांच्याविरूद्ध लढण्याची तयारी नसल्याने त्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने सरजींच्या प्रवेशानंतर भाजपने तिथे आता अधिकृतरित्या खातं उघडलंय.

दरम्यान, गोपाळ अंकुशराव हा पेशानं शिक्षक आहे. त्याच्यावर खुनाचे फक्त आरोप आहेत. आणि वाळूमाफिया ही फक्त ओळख आहे असं भाजप खासदार शरद बनसोड यांनी म्हटलंय. गुंड गोपाळ अंकुशरावला एकप्रकारे बनसोड यांनी पाठिंबा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading