ऑस्ट्रेलियाविरूद्ध सराव मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सराव मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

  • Share this:

won on bangla14 फेब्रुवारी : फेब्रुवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. सध्या फक्त दोन सामन्यांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी एक सराव सामनाही खेळवण्यात येईल. या सामन्यासाठी हार्दिक पांड्या इंडिया-ए चा कर्णधार असेल.

जाहीर झालेल्या संघातून महम्मद शमी आणि अमित मिश्रा यांना बाहेर ठेवण्यात आलंय. दुखापतीच्या कारणास्तव बाहेर असणाऱ्या रोहीत शर्मालाही संघात पुनरागमन करता आलेलं नाही. तसंच बांग्लादेशविरूद्ध निवडण्यात आलेल्या चार जलदगती गोलंदाजांना कायम ठेवण्यात आलंय.

ऑस्ट्रेलिया टूर ऑफ इंडियाचं वेळापत्रक-

- 17-19 फेब्रुवारी : सराव सामना, सीसीआई मुंबई

- 23-27 फेब्रुवारी : पहली टेस्ट, पुणे

- 4-8 मार्च : दूसरी टेस्ट, बँगलोर

- 16-20 मार्च : तिसरी टेस्ट, रांची

- 25-29 मार्च : चौथी टेस्ट, धर्मशाला

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, जयंत यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.

टीम ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, मैथ्यू रेनशॉ, शान मार्श, पीटर हैंड्सकाम्ब, मिशेल मार्श, मैथ्यू वेड (विकेटकीपर), स्टीव ओकीफी, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवुड, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा, जैकसन बर्ड, मिशेल स्वेपसन आणि ग्लेन मैक्सवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading