उघड्यावर बसणाऱ्यांना पोलिसांनी 'उचललं' आणि पोलीस स्टेशनला नेऊन 'बसवलं'

उघड्यावर बसणाऱ्यांना पोलिसांनी 'उचललं' आणि पोलीस स्टेशनला नेऊन 'बसवलं'

  • Share this:

ambarnath314 फेब्रुवारी : अंबरनाथ शहराच्या हद्दीत उघड्यावर शौचास बसणाऱ्या 22 लोकांवर अंबरनाथ पालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत या कारवाई शहरात सुरू आहे.

बुवापाडा ,जावसई ,लादिनाका,फॉरेस्ट नाका,फुले नगर आणि वडोलगांव या परिसरात सार्वजनिक शौचालय असून सुद्धा काही लोक हे उघड्यावर शौचास बसत असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार आज पहाटेच्या सुमारास अंबरनाथ पालिका आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने ८० पालिका कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस या पथकाच्या माद्यमातून ही कारवाई करून २२ लोकांवर मुंबई ऍक्ट १५० आणि १५१ नुसार उघड्यावर शौचास बसून सामाजिक आरोग्यास धोका पोहचण्यासाठी कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले.

दरम्यान, शहर हागणदारी मुक्त करण्याच्या या योजनेच्या माध्यमातून  अंबरनाथ पालिका आता कडक पावलं उचलून अशा प्रकारच्या कारवाईचा धडाका सुरू राहणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी देशमुख यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 06:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading