फुकटची दारुपार्टी जिवावर बेतली, 2 जणांचा मृत्यू

फुकटची दारुपार्टी जिवावर बेतली, 2 जणांचा मृत्यू

  • Share this:

nagar_news3

14 फेब्रुवारी : अहमदनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या दारुपार्टीत अति दारू प्यायल्यानं दोन मतदारांचा मृत्यू झालाय. तर सहा जण अत्यवस्थ झालेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जेऊर जवळच्या पांगरमल गावात ही घटना घडलीये.

अहमदनगर तालुक्यातील जेऊर गटातील पांगरमल गावातील ही दुर्घटना आहे. रविवारी रात्री मतदारांना पार्टी देण्यात आली होती. मात्र सकाळ पासूनच त्यांना त्रास होऊ लागला होता. जेऊर गटातील शिवसेनेच्या उमेदवारानं मतदारांना पार्टी दिल्याचं नागरिकांनी म्हटलंय. पार्टीत बनावट दारुच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.  तर गावात भाजपच्या ही उमेदवारानं पार्टी दिल्याचं नागरिक सांगतायत. त्यामुळे पोलीस तपासानंतरच कोणत्या पार्टीच्या दारुनं बळी गेलाय हे तपासात निष्पन्न होईल.

या प्रकरणी राजकीय कार्यकर्त्यांला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु करण्यात आलीय. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या