S M L

...ही शेवटची संधी, खडसे भूखंड प्रकरणी कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2017 04:38 PM IST

court_khadse14 फेब्रुवारी : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय. वारंवार आदेश देऊनही याप्रकरणी कारवाई झाली नसल्याने हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलीय.

जमीन घोटाळा गैरव्यवहार प्रकरणी हेमंत गावंडे यांनी याचिका दाखल केलीय. पुढच्या सुनावणीदरम्यान हायकोर्ट यासंदर्भात आदेश देणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर चौकशी आयोगाने यासंदर्भात ६ आठवड्यांचा आणखी वेळ मागितलाय, राज्य सरकारनं यासंदर्भात माहिती दिली. आता याप्रकरणाची पुढची सुनावणी 7 मार्चला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 04:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close